सचिन ची रांगोळी हा एक नवा Record | The New Record Of "Sachin Tendulkar"

  • 3 years ago
सचिन चे चाहते नेहमीच सचिन चा, सचिन, सचिन असा जयघोष करत आलेत. सचिनने जरी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या चाहत्यांनी मात्र अजून निवृत्ती घेतलेली नाही. सचिनच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या दोन चाहत्यांनी शाळेच्या पटांगणात भव्य रांगोळी साकारली होती. सचिनचा ४४वा वाढदिवस आणि क्रिकेटमधील त्याची 24 वर्षांची कारकीर्द ह्या संकल्पनेतून अभिषेक साटम आणि संदीप बोबडे या दोन मित्रांनी 44 फुट लांब आणि 24 फुट रुंद अशी भव्य रांगोळी साकारली होती. या रांगोळीची दाखल “ इंडिया बुक्स रेकॉर्ड्स” ने घेतली असून या रांगोळीच्या नावे “ युनिक बर्थडे गिफ्ट” आणि “ युनिक रांगोळी” अश्या दोन विक्रमांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरात भारतात नोंदवल्या गेलेल्या विक्रमांमध्ये ह्या भव्य रांगोळीचा समावेश झाला आहे. रांगोळी काढण्यासाठी ह्या दोघांना दोन दिवस लागले होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended