पहिली तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षक, या व्हिडिओ वर क्लीक करून या प्रेणदायी संघर्षाचा भाग व्हा !

  • 3 years ago
तृतीयपंथियांना कमी लेखावं, त्यांचा तिरस्कार करावा असं कुठेही लिहिलेलं नाही. पण तरीही आपल्या समाजात आणि आणि परदेशांमध्येही तृतीयपंथीयांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांना नोकरीवर घ्यायला टाळाटाळ केली जाते. सगळीकडे त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं. त्यांना समाजामध्ये चांगल्या राहणीमानाची नोकरी किंवा व्यवसाय करता येत नाही. पण आता या प्रश्नावरच्या जागृतीमुळे परिस्थिती बदलते आहे. तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो आहे त्याचमध्ये आपणही चांगंल आयुष्य जगू शकतो असा आत्मविश्वास या समाजामध्ये निर्माण होतो आहे. के. प्रीतिका यशिनीचा प्रीतिका तृतीयपंथी आहेत. आणि त्यांनी जिद्दीने स्वत:च्या कष्टांच्या बळावर पोलीस सबइन्स्पेक्टरची नोकरी मिळवली आहे. प्रीतिका देशातल्या पहिल्या तृतीयपंथी सब-इन्स्पेक्टर ठरल्या आहेत. त्यांनी तामिळनाडूच्या पोलीस अकादमीमध्ये या पदासाठी एक वर्षाच्या अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या अभ्यासक्रमाच्या परिक्षेला बसण्यासाठीही प्रीतिकांना प्रचंड झगडा करावा लागला. तृतीयपंथी व्यक्तींना या परीक्षेला बसण्याच्या मार्गात अनेक अडथळे होते. हे सगळे अडथळे प्रीतिकाने कायदेशीर लढाई लढत तसंच बऱ्याच जणांशी पाठपुरावा करत दूर केले आणि आपली ओळख न लपवता या परिक्षेमध्ये प्रीतिकांनी यश मिळवलं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews