बाहुबली बनलेला Prabhas आता करणार हा नवा कारनामा | Prabhas Letest News | Lokmat Marathi News

  • 3 years ago
‘बाहुबली : द कॉन्क्लुजन’ या सुपरहिट चित्रपटानंतर आता प्रेक्षकांना प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या फर्स्ट लूकलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता ‘साहो’च्या चित्रीकरणाविषयी बरीच माहिती चाहत्यांसमोर आणली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफा या इमारतीवर या चित्रपटातील 20 मिनिटांचं साहसदृष्य चित्रीत करण्यात येणार आहे.‘साहो’मधील या विशेष भागाच्या चित्रीकरणासाठी हॉलिवूडचा प्रसिद्ध अॅक्शन कोरिओग्राफर केन्नी बेट्सची निवड करण्यात आली आहे. केन्नी ‘ट्रान्सफॉर्मर’ (2007) आणि ‘डाय हार्ड’ (1988)सारख्या हॉलिवूड चित्रपटांमधील साहसदृष्यांसाठी ओळखला जातो

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended