निर्व्यसनांना मिळणारअधिक सुट्ट्या | More Holidays To Non Smoker | Interesting News

  • 3 years ago
धूम्रपान न करणाऱ्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना वर्षात सहा दिवसांची अतिरिक्त सुटी मिळेल.धूम्रपानाची संस्कृती कमी करण्यासाठी जपानच्या एका कंपनीने अनोखा नियम तयार केला आहे.. कंपनी कर्मचाऱ्यांनी धूम्रपान संस्कृतीविरुद्ध व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्मोकिंग करणारे कर्मचारी दिवसात अनेकदा ब्रेक घेतात. त्यांचा ब्रेक किमान 15 मिनिटांचा असतो. दिवसभरात असे अंदाजे 5 ब्रेक होतात. या हिशेबाने जे धूम्रपान करत नाहीत, ते धूम्रपान करणाऱ्यापेक्षा जास्त वेळेपर्यंत काम करतात. कंपनी व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांचे म्हणणे योग्य वाटले. त्यामुळे धूम्रपान न करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एका वर्षात सहा दिवस अतिरिक्त सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. धूम्रपान विरोधाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. नवा नियम लागू होताच 4 कर्मचाऱ्यांनी धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमध्ये धूम्रपानाची संस्कृती जास्त आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जपानमध्ये एकूण 21.7% लोक धूम्रपान करतात. दरवर्षी 70 हजार जण फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडतात. 15 हजार लोकांचा पॅसिव्ह स्मोकिंगशी संबंधित आजारामुळे मृत्यू होतो...ह्या नियमाचे सगळीकडे स्वागत केले गेले पाहिजे

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended