महाराष्ट्राच्या ‘भरतपूर’मध्ये पक्ष्यांचे आगमन; १९ हजार पक्ष्यांची गणनेत नोंद

  • 3 years ago
नाशिक : वनविभाागच्या वन्यजीव खात्याच्या नियंत्रणात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या बॅकवॉटरला चापडगाव शिवारात पक्षी अभयारण्य विकसीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेले हे अभयारण्य जांभळ्या पाणकोंबडीसह राखी बगळा (ग्रे-हेरॉन), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), मोठा रोहित (फ्लेमिंगो), कॉमन क्रेन (करकोचा), रंगीत करकोचा (पेंटेड स्टॉर्क ), मार्श हॅरियर यांसह बदकाचे विविध जातींसाठी प्रसिध्द आहे. दरवर्षी हिवाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्ष्यांचे आगमन झालेले पहावयास मिळते. हिवाळ्याचा हा हंगाम पक्षीप्रेमींसाठी पर्वणीकाळ ठरतो.विविध जातीचे देशी-विदेशी अशा १९ हजार ५२६ पक्ष्यांची नोंद यावेळी पक्षीनिरिक्षकांकडून नोंदविण्यात आली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended