नवी मुंबई : व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकून 2 कोटींचा लुटला ऐवज

  • 3 years ago
नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मधील कुसुम अपार्टमेंटमध्ये राहणा-या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला व्यापा-याच्या घरावर शुक्रवारी (27 ऑक्टोबर) दुपारी दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून घरातील दोन महिलांना डांबून ठेवले व दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 2 कोटी 9 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.