भारत चांगलं लक्ष ठेवू शकतो पाकिस्तानवर | जाणून घ्या पूर्ण स्टोरी | India Eyes on Terrorism.

  • 3 years ago
भारत चांगलं लक्ष ठेवू शकतो पाकिस्तानवर | जाणून घ्या पूर्ण स्टोरी |

दहशतवाद्यांना समर्थन देणार्‍या पाकिस्‍तानविरोधात अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पाकच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारताकडून अमेरिकेला मदत होऊ शकते असे अमेरिकेच्या यूनोमधील राजदूत निक्की हेली यांनी म्हटले आहे. अमेरिका भारत मैत्री परिषदे तर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

हेली म्हणाल्या, अफगाणीस्तान आणि दक्षिण आशियातील दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने नवी रणनीती आखली आहे. या रणनीतमध्ये भारताला सामील करून दहशतवादविरुद्धची लढाई तिव्र करता येऊ शकते. आमचे लक्ष्य हे दहशतवाद्यांना आण्विक शस्त्रांपासून दुर ठेवणे हे आहे. यात भारताचे मोलाचे सहकार्य मिळू शकते.’

अमेरिकेला अफगाणीस्‍तानमध्‍ये पायभूत आणि आर्थिक विकासाची कामे करायची आहेत. त्‍यासाठी त्‍याने भारताकडे मदत मागण्‍याचे ठरवले आहे. मात्र पाकिस्तानने याला विरोध केला आहे. आता अमेरिकेच्या उच्च पदस्थ अधिकार्‍याने भारताकडे पुन्हा एकदा मदत करण्याचे अवाहन केल्याने पाकिस्‍तानकडून कोणती प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Recommended