अभिनेता जॅकी चेनची मुलगी आहे संलेंगिक | Jackie Chan's Daughter Is Lesbian

  • 3 years ago
जॅकी चॅन च्या ऍक्शनने सारे जग त्याचे चाहते आहे. आजही जॅकीच्या चित्रपटांना जगभरातील चाहते प्रचंड प्रतिसाद देतात. पण सोशल मीडियावर सध्या वेगळ्याच विषयाला उधाण आले आहे आणि ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनची मुलगी एटा नग चक लामच्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चेला खतपाणी घालत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यात तिने ती लेसबियन असल्याचे म्हटले. एटाला चायनीज समुदायाकडून पाठिंबा मिळाला आहे. लोकांनी तिच्या पोस्टवर लिहिले की, ‘स्वतःच्या सुखापेक्षा दुसरे काहीच महत्त्वाचे नसते. तू खूश राहा.’ तिच्या लैंगिक प्राधान्यांबद्दल तिच्या मित्र-परिवाराचे मतही तिने या पोस्टमध्ये मांडले. एटा १८ वर्षांची असून तिचे ३० वर्षीय अँडी ऑटमशी प्रेमसंबंध आहेत. अँडीनेही तिच्या इन्स्टाग्रामवर एटासोबतचा फोटो शेअर करत समलैगिंक असल्याची कबुली दिली. एका मुलाखतीत वडिलांबद्दल बोलताना एटाने सांगितले की, ‘ते माझे वडील नाहीत. त्यांच्यासाठी माझ्या मनात कोणत्याही भावना नाहीत. त्यांनी मला जन्म दिला असला तरी मी त्यांना कधीही माझे पिता मानले नाही. माझ्या आयुष्यात त्यांना काही स्थान नाही. मी कधीच म्हणणार नाही की जॅकी चॅन माझे वडील आहेत. मी म्हणेन की, ओह, जॅकी चॅन… एक अभिनेता.’

Recommended