नाशिकमध्ये गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला सुरुवात

  • 3 years ago
नाशिक : किर्ती कलामंदिर संस्थेतर्फे २४ व्या पंडीत गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला शुक्रवारी (दि. १८) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. तीन दिवस चालणा-या या महोत्सवाचे पाहिले पुष्प आदिती नाडगौडा - पानसे यांनी 'दि रिदमीक पॉईंज' या संकल्पनेवर आधारित कथक नृत्याने गुंफले. संगीत आणि नृत्याचा अनोखा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमला रसिकांनी विशेष दाद दिली.