सहा वर्षापासून पायदळ दिंडीची परंपरा कायम

  • 3 years ago
शिरपुर जैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या संत ओंकारगीर बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेलगाव ओंकारगीर येथून श्री संत शेगाव अशी पायदळ दिंडी गत सहा वर्षापासून आयोजित केली जाते. यावर्षीही पायदळ दिंडी १० ऑगस्ट रोजी शेकडो भाविकांच्या साक्षीने शेगावकडे मार्गस्थ झाली. शेलगाव येथे ओंकारगीर बाबा मंदिरात धार्मिक सोपस्कार पार पाडल्यानंतर ही दिंडी सकाळी शिरपूरकडे रवाना झाली.