शिव कावड यात्रा  मिरवणुकीने दुमदुमली शेलूबाजार नगरी

  • 3 years ago
शेलूबाजार (वाशिम) : येथील शिव कावड मंडळाच्यावतीने ३१ जुलै रोजी वाघागड येथून कावड आणून गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्वप्रथम साईश्रध्दा संस्थान येथे कावडीचे स्वागत करण्यात आले . त्यानंतर अकोला रोड ते चौकातून  मिरवणूक काढण्यात आली. या कावड यात्रेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.