Amitabh Bachchan's Bodygaurd | बिगबींच्या बॉडीगार्डचा पगार ऐकुन थक्क व्हाल! |Sakal Media|

  • 3 years ago
बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात.. मात्र आता त्यांचा मराठमोळा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे चर्चेत आलाय... त्याला कारण आहे जितेंद्र शिंदेंना वर्षाकाठी मिळणारा दीड कोटी रुपये पगार... अमिताभ बच्चन यांच्या मागे सावलीसारखा वावरणाऱ्या जितेंद्रला महिन्याला साडे बारा लाख रुपये पगार मिळतो... हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंच्या कमाईच्या चर्चेनंतर पोलीस आयुक्तांकडून त्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आलाय... जितेंद्र शिंदे यांची स्वत:ची खाजगी सिक्युरीटी एजन्सी देखील असल्याची माहिती समोर आलीय.. पोलिस खात्यात असताना खासगी सुरक्षा संस्था चालवणं हे पोलिस नियमाविरुद्ध आहे... त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी देखील करण्यात येणार आहे... तसंच शिंदे यांना इतकं वेतन दिलं जात होतं का? याबाबत अमिताभ बच्चन यांच्याकडूनही माहिती घेतली जाणारय..
#amitabhbachchan #bodygaurd #salary #maharashtra #pune