Taliban Captures Kabul : काबुलवर तालिबानचा ताबा

  • 3 years ago
Taliban Captures Kabul : काबुलवर तालिबानचा ताबा

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे हजारो लोकांनी काबूल (Kabul Airport) सोडून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पायपीट सुरू केली आहे. एएफपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी काबूल विमानतळावर हजारो लोकांनी गोंधळ केला. त्यानंतर अमेरिकी सैन्याने (USA Army) जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. अफगाणिस्तानच्या प्रेसिडेंट पॅलेसवरही ताबा झाला असून राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) यांनी देश सोडला आहे. अफगाणिस्तानचं नाव बदलण्याची शक्यता सुद्धा आहे.

#Taliban #Kabul #Afghanistan

Recommended