Satara : आषाढी वारीसाठी गोंदवलेकर दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान

  • 3 years ago
Satara : आषाढी वारीसाठी गोंदवलेकर दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान

Satara (गोंदवले) : वर्षभरापासून भक्तीच्या मेळ्यासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांनी विठू माऊलीच्या भेटीसाठीचा मार्ग डोळे भरून पाहिला. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर दिंडीने आषाढी वारीसाठी आज प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान केले. यावेळी वारकऱ्यांच्या हाती टाळ-मृदंग, पताका बरोबरच तोंडावर मास्क व सामाजिक अंतर यांचीही भर पडली. यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु नियमांचे पालन करून अगदी मोजक्याच दिंड्यांसह वारकऱ्यांना आषाढी वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची दिंडी पोचणार असली तरी नेहमीप्रमाणे दिंडीचे आज प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान करण्यात आले.श्रींच्या समाधी मंदिरात केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रम सुरू होते. सकाळी नऊच्या सुमारास मंदिरात 'श्री अनंत कोटी ब्रह्मणांडनायक...'चा जयघोष झाला अन श्रींच्या पादुकांचे विश्वतांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

व्हिडिओ : फिरोज तांबोळी

#ashadhiwari #satara