• 4 years ago
Anchor : रायगड जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाचे आगमन झाले आहे. आज सकाळपासून काही भागात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. १० आणि ११ जूनला जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून ताशी १२ ते २० किमी वेगाने वारे वाहण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे हे दोन दिवस रायगडकरांसाठी धोकादायक ठरणार आहेत. अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

निधी चौधरी.- जिल्हाधिकारी,रायगड

जिल्ह्यातील १०३ गावे दरडग्रस्त -

रायगड जिल्ह्यात महाड ४९, पोलादपूर १५, रोहा ३, म्हसळा ६, माणगाव ५, पनवेल ३, खालापूर ३, कर्जत ३, सुधागड ३, श्रीवर्धन २, तर तळा तालुक्यात १ अशी एकूण १०३ गावे ही दरड कोसळण्याच्या धोक्याच्या सावटाखाली आहेत.

#heavyrainfall #raigad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended