• 4 years ago
अविश्वास ठरावानंतर चिडलेल्या पंचायत समिती सभापतींचा सदस्यांवर प्राणघातक हल्ला

शिवसेना सभापतीचा रिसाॅर्टमध्ये गोळीबार : पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल झाल्याने त्यांनी चिडून जाऊन त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. पुण्यातील डोणजे गाव परिसरातील एका खासगी रेसॉर्टमध्ये हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. भगवान पोखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ल्या केल्याचा दावा सदस्यांकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोनजन गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. नक्की काय घडले, हे तेथील उपस्थित सदस्यांनी सांगितले.

#shivsena #khed

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended