कोरोनाचा कहर : भारतात 24 तासांत 4 हजार 194 मृत्यू भारतात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनामुळे 4 हजार 194 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण मृतांची संख्या आता 2 लाख 95 हजार 525 झाली आहे. याचवेळी मागील 24 तासांत कोरोनाचे 2 लाख 57 हजार 299 नवीन रुग्ण सापडले आहेत. याच काळात 3 लाख 57 हजार 630 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
#COVID, #COVID-19, #Vaccination, #Samples, #Deaths, #Discharges, # Death Toll