गृहमंत्र्यांच्या घरासमोर भाजयुमोची निदर्शने

  • 3 years ago
नागपूर: राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात औरंगाबाद येथे महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पोलीस हे प्रकरण दडपू पाहत आहेत, असा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. येथे गृहमंत्र्यांच्या सिव्हील लाईन्स येथील घरासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर तात्काळ कारवाई करावी, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून तीन महिन्यात हे प्रकरण निकाली काढावे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.