श्रीरंग बारणे यांनी केले पवना नदीचे जलपूजन

  • 3 years ago
मावळात पावसाने कृपादृष्टी दाखवल्याने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण ओव्हर फ्लो झाले असून मागील काही दिवसांपासून पावसानेही धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे धरण पूर्ण भरले आहे. गेल्या वर्षभरापासून पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. आता यात सुधारणा होईल अशी अपेक्षा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते पवनामाईची खणा नारळाने ओटी भरून पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले
(व्हिडिओ - दिलीप कांबळे)