शरद पवार यांनी सीरममध्ये जाऊन कोणती लस टोचून घेतली, हे घ्या जाणून

  • 3 years ago
पुणे : कोरोनावरील लस तयार करण्याचे काम करणाऱ्या सिरम इन्स्टि्टयूटमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट दिली. या आधी पण त्यांनी सिरमला भेट दिली होती. त्यामुळे साहजिकच पत्रकारांनी याबाबत पवारांना प्रश्न विचारला. पवार कोरोनाच्या संकटात राज्यभर इतके फिरत आहेत. त्यासाठीचे ते नक्की कोणते औषध घेतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला होता. त्याचे उत्तर खुद्द पवारांनीच दिले.

#Sarkarnama #SarkarnamaNews #SharadPawar #politician #news #video #Maharashtra #MarathiNews