नागपुरकरांनी मनावर घेतले, तर काय होऊ शकते, हे आज दिसले : तुकाराम मुंढे

  • 3 years ago
Sarkarnama | Maharashtra | Politics | नागपूर : महानगरपालिका प्रशासन, महापौर आणि सर्व लोकप्रतिनिधींनी दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले. नागपुरकरांनी ते मनावर घेतले. अत्यावश्‍यक गरज वगळता आज कुणीही घराबाहेर पडलेले नाही. सर्व आस्थापनाही बंद आहेत. अत्यावश्‍यक सेवाच तेवढ्या सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी मनावर घेतले तर काय होऊ शकते, हे आज दिसून आले. पण हे फक्त दोन दिवसच नाही, तर कोरोना हद्दपार होईपर्यंत करायचे आहे, असे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.

Recommended