औरंगाबाद : "राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात निर्यात होणाऱ्या दुधाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा होणार नाही. सरकारची ही घोषणा फसवी आहे,'' असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 11 जुलै 2018 रोजी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना केला. स्वाभिमानी आपल्या आंदोलनावर ठाम असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या सरकारला सळो की पळो करून सोडू, प्रसंगी कायदा हातात घेऊ असा इशारा देखील त्यांनी दिला.
Category
🗞
News