गुजरातमध्ये शिवसेना किमान 40 जागांवर लढणार

  • 3 years ago
नाशिक : "गुजरातच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर येऊन उध्दव ठाकरेंवर प्रचंड दबाव आणला. गुजरात सरकार विरोधात तीव्र भावना असल्याचे त्यांनी मांडले. त्यामुळेच गुजरात विधानसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय बदलावा लागला, आता चाळीस ते पन्नास जागांवर शिवसेना उमेदवार देईल," अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.