चंद्रकांतदादांच्या खड्डे दर्शनासाठी खासदार हेमंत गोडसेंचे 'अॅप'

  • 3 years ago
नाशिक : राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांनी नागरीक त्रस्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'सिटीझन जर्नालिझम' करीत या प्रश्नाला सोशल मिडियावरुन वाचा फोडली. त्यानंतर आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी 'इस्त्रो'च्या मदतीने एक 'अॅप' विकसित केले आहे. हे 'अॅप' रस्त्यावरील खड्ड्यांचे दर्शन घडवत नागरीकांना सावध करील. या 'अॅप' द्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही राज्यातील सर्वच रस्त्यांचे खड्डे दर्शन घडविण्याचा गोडसे यांचा मानस आहे.