बहुलीच्या जळीतग्रस्ताच्या नवीन घरांचे भूमिपूजन नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले |SakalMedia

  • 3 years ago
खडकवासला, ता. ६ :
बहुलीच्या भगतवाडीत मागील महिन्यात लागलेल्या आगीत १६ कुटुंबांची घरे भस्मसात झाली होती. या घटनेची बातमी वाचून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घटनास्थळी गेले होते. नाम फाउंडेशनच्या माध्यामतून त्यांना नवीन घरे बांधून देण्याचा संकल्प नानांनी केला होता. स्थानिक नागरिक व जळीतग्रस्त कुटुंबाच्या हस्ते नवीन घरांचे भूमिपूजन आज मंगळवारी करण्यात आले.
पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर, नाम फाउंडेशनचे व्यवस्थापक गणेश थोरात बहुलीचे उपसरपंच बंडा भगत, माजी सरपंच दत्ता भगत, मारुती कोंडेकर, अनिल भगत, सोमनाथ कांबळे, रामभाऊ पडर, भरत भगत, विठ्ठल भगत, रूपाली भगत, सुनील भगत यासह काही ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या दुर्घटनेत ५० हून अधिकजण बेघर झाले आहेत. अनेक दानशूर व्यक्तींनी त्यांना तातडीची मदत देखील केली होती. त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांशी नाना पाटेकर बोलून घरे उभारण्यासाठी आम्ही पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

याबाबत माहिती देताना नामचे व्यवस्थापक थोरात म्हणाले की, “मागील वीस दिवसात या नागरिकांशी चर्चा केली. जळीत घरांच्या उर्वरित भिंती काढून त्या बाजूला केल्या आहेत. जागेची सफाई केली आहे. त्या ठिकाणी नवीन घर बांधण्यासाठी ती सपाट जागा त्यांनी मोजली केली आहे. बाधित नागरिकांच्या संमतीने आर्किटेक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन घर बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच, या संदर्भाने बहुली ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन या कामाला आज सुरवात केली आहे. या जळीतग्र्स्तांची घरे बांधण्यासाठी आम्ही नाम फाउंडेशनच्या माध्यामतून सुरुवात करत आहे. यासाठी काही दानशूर व्यक्तींनी यात सहभागी होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, त्यांनी सिमेंट, वाळू, विटा, क्रश संड लागणार आहे अशा वस्तू स्वरुपात आम्ही स्वीकारणार आहे. नाना पाटेकर यांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यापूर्वी त्यांना नवीन घरे बांधून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या हातात साठ दिवस उरले आहेत. त्यासाठी दिवसात घराचे बांधकाम पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे.
----------------------------

व्हिडीओ- राजेंद्रकृष्ण कापसे, सकाळ बातमीदार- खडकवासला

#sakalmedia #khadakw