#NewYear2021: नवीन वर्षाच्या स्वागताला ड्रग्सचा कोडवर्ड | Drugs | Maharashtra Police |Mumbai | Sakal

  • 3 years ago
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत होणाऱ्या वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा वापर होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी ड्रग्ज पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. या आधी केवळ गुप्तहेरांच्या मार्फत हे काम करणारे पोलीस आता ड्रग्ज तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी सोशल मीडियावरही नजर ठेऊन आहेत.बदलत्या काळानुसार ड्रग्ज तस्करांनी आपल्या कोडवर्डमध्येही बदल केल्याचं पोलिसांच्या तपासातून पुढं आलंय. या कोडवर्डचा वापर सोशल मीडियामध्ये केला जातोय.
काय आहेत ड्रग्जचे कोडवर्ड?
एक मीटर कापड म्हणजे एक किलो MDMA
दोन मीटर कापड म्हणजे दोन किलो MDMA
छोटे ग्राहक MDMA ला हॅपी पिल्सच्या नावाने ओळखतात.
एक पॉट म्हणजे एक किलो गांजा
एक चिबा म्हणजे एक किलो चरस
चरसला क्रिम असंही म्हटलं जातंय
स्मॅक म्हणजे हिरोइन
हिरोइनला जादू ची पुडी असं देखील म्हटलं जातं.
आइस म्हणजे एमेफेटामाईन
कोणत्याही प्रकारचे ड्रग्सचे सेवन न करता नूतन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
#Drugs #Mumbai #MaharashtraPolice #Maharashtra #NewYear #Party #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended