पदवीधरांची परीक्षा: जोशी आणि वंजारी यांच्यात काट्याची लढत | Sakal Media |

  • 3 years ago
नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर संघाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपपुढे आपला परंपरागत मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान आहे. भाजपने महापौर संदीप जोशी या युवा नेत्याला उमेदवारी दिली आहे. संदीप जोशी माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. दुसरीकडे यंदा काँग्रेसने प्रथमच अधिकृत उमेदवार म्हणून ॲड. अभिजित वंजारी यांना रिंगणात उतरवले आहे. महाआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने सर्व राज्याचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची असल्याने भाजपने आपली सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. अंतर्गत मतभेदसुद्धा चव्हाट्यावर येऊ दिले नाही. उलट सर्व प्रमुख नेत्यांना एका व्यासपीठावर आणले. पदवीधरांचा मेळावा घेऊन ‘हम साथ साथ है...’चा संदेशही दिली. स्वतः फडणवीस दोन दिवसांपासून नागपूरमध्ये ठाण मांडून बसले आहेत.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended