हौसेपोटी घेतला तब्बल साडेतेरा लाखांचा बैल | Sakal Media |

Sakal
Sakal
2,120 followers
3 years ago
हौसेपोटी घेतला तब्बल साडेतेरा लाखांचा बैल
बैल व बैलगाडा शर्यतीची प्रचंड आवड असल्याने खेड तालुक्‍यातील निघोजे येथील बापू तुकाराम आल्हाट या तरुणाने तब्बल साडेतेरा लाखांचा बैल खरेदी केला. इतर बैलांपेक्षा अतिशय तरबेज असा हा "रामा' नावाचा बैल काही क्षणातच शर्यत पूर्ण करतो अशी या बैलाची ख्याती. न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या बैलगाडा शर्यतीवर बंदी असली तरी केवळ आवड म्हणून इतका महागडा बैल खरेदी केल्याने "हौसेला मोल नसते' याचा प्रत्यय येथे येतो. आज ना उद्या शर्यतीला पुन्हा परवानगी मिळेल या अपेक्षेने कुटुंबातील सदस्याप्रमाणे आल्हाट कुटुंबीय बैलांची जोपासना करीत आहे. या कुटुंबासाठी गुरुवारी (ता. 17) साजरा होत असलेल्या बैलपोळा सणाचा उत्साह म्हणजे दिवाळी सणापेक्षाही अधिक असल्याचे स्पष्ट होते. (व्हिडिओ : मंगेश पांडे)
#SakalMedia #Bullockcartrace #OX #Pimpri #PCMC

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended