देशाच्या स्वातंत्रलढ्याला लाभला स्पर्श गुमगावच्या शौर्याचा | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
गुमगाव (जि. नागपूर) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक लहान-मोठे लढे झालेत. त्यातील एक लढा नागपूर जिल्ह्यातील गुमगावचा. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये गुमगावातील अनेक देशभक्त स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर होते. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान गावामध्ये दररोज प्रभातफेरी काढल्या जायची. यामधून लोकांच्या मनात देशभक्ती, देशप्रेम निर्मितीचे महत्त्वाचे कार्य केल्या जात असे. स्वातंत्र्यलढा चिरडून टाकण्याच्या उद्देशाचा एक भाग म्हणून गुमगाव येथील देशभक्तांना पकडण्यासाठी इंग्रज गावामध्ये आले असता, गावातील कित्येक देशभक्तांनी इंग्रजांना परतवून लावण्यासाठी त्यांच्या मार्गाने दगडफेक केली. देशभक्तांच्या दगडफेकीला प्रत्युत्तर देण्यासाठी इंग्रजांनी देशभक्तांच्या दिशेने गोळीबार केला. देशाच्या स्वातंत्रलढ्यात सहभागी तसेच हौतात्म्य पत्करलेल्या देशभक्तांच्या स्मरणार्थ गुमगाव येथे प्रशासनाने हुतात्मा स्मारकाची निर्मिती केली आहे. देशाच्या स्वातंत्रलढ्यात सहभागी आणि हौतात्म्य पत्करलेल्या गुमगाव येथील सर्व देशभक्तांच्या स्मृतीस शतशः प्रणाम..!!
(व्हिडिओ : रवींद्र कुंभारे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.