घरगुती टाकाऊ वस्तूंपासून तयार केले तणनाशक फवारणी यंत्र | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
कोरपना (जि. चंद्रपूर) : यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांसमोर मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व राजुरा तालुक्‍यात कापूस उत्पादक शेतकरी कामात व्यस्त आहेत. पिकांची वाढ योग्य झालेली आहे. सोबतच तण वाढल्यामुळे ते काढण्यासाठी मजुरांची संख्या पुरेशी मिळत नाहीत. कोरोनामुळे एकत्रित येण्यावर व वाहतुकीवरसुद्धा नियमानुसार बंधने आलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका येथील नांदाफाटा या गावचे प्रयोगशील शेतकरी किशोर चौधरी यांनी घरगुती टाकाऊ वस्तूंपासून तणनाशक यंत्र बनविले आहे. आपल्या कल्पकतेतून प्रयोगशील शेतकऱ्यांनी यंत्राची निर्मिती केली आहे. (व्हिडिओ : सिद्धार्थ गोसावी-संदीप खिरडकर)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended