विदर्भातील काही बुधवारच्या महत्वाच्या बातम्या

  • 3 years ago
नागपूर ः उपराजधानीतील मध्यवर्ती कारागृह कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याची भिती व्यक्त करण्यात आली. आतापर्यंत एक-एक वस्ती कोरोनाच्या विळख्यात येत होती. आता सरकारी कार्यालये देखील कोरोनाच्या रडारवर येत असल्याची शक्‍यता आहे. कारागृह कोरोनाच्या नकाशावर आले असून येथील 10 जण बाधित आढळले आहेत. 

नागपूरः खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने अथवा हॉल नाही. अशात मनपाने हनुमाननगर येथे तयार केलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये झोनचे कर संकलन कार्यालय हलविल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे महापौर संदीप जोशी यांनी येथे पोहचून आज सायंकाळपर्यंत हॉल रिकामा न झाल्यास 2 जुलैला नगरसेवकांसोबत उपोषणाला बसणार, असा इशारा दिला आहे. 

नागपूर : मागील दोन वर्षांपासून समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आंतरजातीय विवाह योजनेचे शेकडो लाभार्थी लाभापासून वंचित होते. त्यांच्या मागणीची आता दखल घेण्यात आली असून सुमारे एक कोटी 88 लाख रुपये जमा होणार आहे. 

चंद्रपूर : जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आदेश काढले आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू असणार आहे.

यवतमाळ : यंदा पाऊस भरपूर असल्याचे हवामान खात्याचे अंदाज आहेत. मॉन्सूनही अगदी वेळेवर आला त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, पण अजून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांची पेरणी वाया जाईल आणि त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येईल, त्यामुळे शेतकरी डोळ्यात प्राण आणून पावसाच्या वाटेकडे डोळे लाऊन बसले आहेत.

अमरावती : दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र पावसाच्या सरीसह भक्‍तीरंगात न्हाऊन निघतो. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे शासनाकडून खबरदारी म्हणून मंदिरांची टाळेबंदी कायम ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्ष पंढरपुरातही वारीवर बंदी आहे. त्या अनुषंगाने आज कोरोनाच्या सावटात आषाढी एकादशी साजरी झाली.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha