वेलदोडा , वीर्य वाढवणे , उच्च रक्तदाब , सर्दीपासून सुटका , स्मरणशक्ती , तणावापासून आराम , अभिनव निसर्ग उपाय

  • 4 years ago
About this video : -

पुरुषांसाठी तर वेलदोडे अत्यंत उपयुक्त आहेत . दररोज सकाळी एक वेलदोडा खाऊन त्यावरून दूध पिल्याने शरीरातील वीर्य वाढण्यास मदत होते.

ज्यांचे केस गळत आहेत अशांनी वेलदोडे खाऊन त्यावरून पाणी पिल्यास केस गळतीसारख्या समस्या सुटेल.

पित्त आणि पोट साफ न होण्यासारख्या तक्रारी वेलदोडे खाल्याने दूर होतात .

सकाळी रिकाम्या पोटी आणि झोपण्यापुर्वी एक-दोन वेलदोडे चावून खा . त्यानंतर कोमट पाणी पिल्यानंतर काही वेळातच घशात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळेल .

वेलदोडयात पोटॅशिअम आणि फायबर असते ते रक्तदाबावर नियंत्रण मिळवते .

वेलदोडयाचे दाण्यांमध्ये दोन- चार चमचे दूध घालून त्याला मिक्सरमध्ये घालून एकजीव करा . त्यानंतर या मित्रणात १ ग्लास दूध मिसळून ते पिल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते.