UNCUT | बीड | दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडेंचं संपूर्ण भाषण

  • 6 years ago
तोडपाण्याची कामं आम्ही करत नाही, असे म्हणत ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. बीडमधील सावरगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी उपस्थित जनतेशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी सावरगावच्या गडाचं नावही जाहीर केलं. "भगवानगड जसा भगवानबाबांची कर्मभूमी, तशी सावरगाव भगवानबाबांची जन्मभूमी आहे. म्हणजेच त्यांच्या भक्तीचा गड आहे. म्हणून या गडाचं नाव 'भगवानभक्ती गड'." अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली.