विसरशील खास मला दृष्टिआड होता - चित्रलेखा दीक्षित

Chitralekha Dixit

by Chitralekha Dixit

44 views
विसरशील खास मला दृष्टिआड होता - चित्रलेखा दीक्षित
गीत - ज. के. उपाध्ये
संगीत - यशवंत देव
स्वर - आशा भोसले
राग - जोगकंस , मालकंस
( आकाशवाणीवरील मूळ प्रसारण- सुधा मलहोत्रा )

विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशि जरी आता

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायहि विविध, विविध विषय भोवताली
गुंतता तयात कुठे, वचन आठवीता

स्वैर तू विहंग, अंबरात विहरणारा
वशहि वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता

अंतरिची आग तुला जाणवू कशाने
बोलवे न वेदनाच वचन दुःख नेणे
याकरता दृष्टिआड होऊ नको नाथा


NOTE: ALL COPY RIGHTS VEST WITH ITS TRUE OWNER. NO COPYRIGHT VIOLATIONS OR COPYRIGHT INFRINGEMENT ARE INTENDED. NOT FOR COMMERCIAL PURPOSE