ट्रकने बस व मोटारसायकल वाचवण्यासाठी ब्रेक लावला. ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रक ट्रकटर धडकला

  • 2 months ago
सिल्लोडच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने बस व मोटारसायकल वाचवण्यासाठी ब्रेक लावला. ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रक ट्रकटर धडकला फर्दापूर वार्ताहर हक्कानी शेख आणि नियंत्रण सुटून 15 फूट थेट नदीत पडला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता घडली. माहितीनुसार सिल्लोड कडूण ढेप घेउण मालेगावकडे जाणारा ट्रक क्र M H. 18 BG 3053 फर्दापूर बसस्थानकावर उभ्या असलेल्या बस व मोटारसायकलला वाचवण्यासाठी ब्रेक लावला, मात्र ब्रेक न लागल्याने ती वाचवण्याच्या प्रयत्नात समोरून पेट्रोल पम्पा हुन डीज़ल भरून येणाऱ्या ट्रकटर ला धडकून थेट 15 फुट नदीत कोसळली याच घटनेत ट्रकचालक शेख रज्जाक शेख चिराग रा.मालेगाव हा जखमी झाला.ट्रक । या अपघातात मोठी दुर्घटना टळली।हा ट्रक बसस्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडकला असता तर मोठा अनर्थ घडला असता.ट्रक व ट्रकटरचे मोठे नुकसान झाले असून ट्रकटरमध्ये भरलेला मका रस्त्यावर विखुरला.फर्दापूर बसस्थानकावर स्पीड ब्रेकर फलेश लाइट बसविण्याची मागणी होत आहे.